बोलायला खूप आहे, सुरुवात तशी एका विषयाने होणे कठीण. तरी मग मी माझ्याबद्दल सांगू ?
हो.. का नाही. तुझ नाव ?
बाई.. पुरुषाला हवी असणारी एक भौतिक इच्छा पण ती बाई नसते, ती असते सोबती काही क्षणांची. “बारीकशी इच्छा..” म्हणजे बाई. काही वेळासाठी पुसरुषाला जी बारीकशी इच्छा होते ती पूर्ण करणारी व्यक्ति.
ही व्याख्या प्रत्येक बाईसाठी होऊ शकते ?
जग इतक पुढे आलेल आहे की त्या परमेश्वराला ही त्याच्या निर्मितीवर विचार करावासा वाटत असेल. काय बदलल नाही या जगात ? सगळ बदलल, माणूस जात, त्याच राहणीमान, त्याच्या इच्छा, भौतिक सृष्टि, विद्यान आणि तंत्रज्ञान सुद्धा. दैवी शक्तिला आव्हान देणारे शोध माणूस लावत असेल तर देवाला विचारनारे पुढे किती उरतील ? पण तरी ही आशा जगात बाई म्हणायला पुरुषाला खांदा लावून चालणारी बाई तिची सावली तु बघितलीस का ?
नाही..
तिची सावली तिच्या पायासोबत चालत असते पण मागे पूर्ण मोकळ्या रस्त्यावरून तिच्या सावलीचे दुसरे टोक घर, मूल, संसार या गोष्टींत अडकून राहिलेली असते. ही बात दिवसाच्या उन्हाची झाली. रात्री तीच सावली मृत होते पण तिचे दुःख काय करणार कारण तो पर्यन्त ती स्वतः बाई त्या जागेवर आलेली असते. या वेळात पुरुष आपले बलदंड खांदे गाळून बसतो पण ती बाई तिच्या नाजुक खांद्यांना इतक झिजवते की एक सवय बनून जाते. मग ना तिला तिची कीव येते ना तिला तो समजून घेऊ शकतो आणि दुसरी बाई छे..! अशक्य.. अशक्यच.. कारण जग इतक पुढे आल पण एक बाई दुसऱ्या बाईला पुढे जाऊन देऊ शकत नाही. पुरुष आणि स्त्री दोघे जेव्हा शिकार करून निवारा जपत अपत्य पोसायची तेच युग बदलत गेल तसे पुरुष पुढे होऊन सगळ करू लागला. काही जबाबदऱ्या तात्पुरत्या स्त्रीला देऊ लागला आणि त्या जबाबदऱ्या परत करून टाकण तिला जमलच नाही. मग पुढे त्यात फक्त भरती होत गेली जबाबदारी नावाच्या त्वचेची. ही त्वचा प्रत्येक बाईला आवडते. तिला सजवायला आवडते. मिरवायला आवडते. गोऱ्या कातडयाच्या सौंदर्याला वाईट नजरेचा शाप असतो म्हणतात पण प्रत्येक बाईला जबाबदारीच्या रंगाची जी त्वचा मिळाली आहे तिला शाप कसला ? मृत्यू हे मिळलेल तिला बक्षीस असव अस मला वाटत. पण ते बक्षीस ही कुणा बाईला घ्यायची हौस नसते. प्रथा-रूढी फक्त बाईलाच का? स्वातंत्र्य सगळ पुरुषांनाच का ? कारण पुरुषाला आम्ही जबाबदारीतून स्वातंत्र्य दिल पण त्याच्या जबाबदारीची साखळी स्वतःच्या पायल बांधून घेतली. कोणती बाई दुसऱ्या बाईला स्वातंत्र्य मिळवण्याचा सल्ला देते ? आणि कोणता पुरुष दुसऱ्या पुरुषाला पारतंत्र्याच्या गोष्टी सांगतो ? जेवण तू बणवलच पाहिजे, हा सल्ला मिळतो पण तू बनवल आहेस तर आधी किंवा सोबत जेव म्हणून कोणती बाई म्हणते ? पुरुष लाख बसेल वाट बघत पण बाईच मन होत का आधीच जेवायच ? देवी देवतांच्या परंपरा हजारो वर्षे अजून ही सुरू आहेत. मग बाईला दिलेले एका बाईचे सल्ले इतक्या सहज बाजूला करता येतील अस वाटत का तुला ?
नाही.. पण प्रयत्न केलाच तर?
अडवणारी बाईच आडवी येणार.
अस का वाटत तुला ?
कारण एक बाई पुरुषाला अगदी पूर्ण म्हणजे १०० टक्के समजून घेते पण बाई दुसऱ्या बाईला समजून घेताना तिची बुद्धी कुठे जाते माहीत नाही. ही बुद्धी जर का लिंग बघून येत-जात असेल तर मग शिक्षण घेताना बुद्धी नसलेले प्रत्येक मूल बाईच का नाही झाले ? बाई होणारी मुलगी तिची संख्या कमी आहे ती कोणामुळे ? पुरुषाला स्त्री ही प्रत्येक वयातली आवडते मग समजून जा तू मुलगा असावा अशी कल्पना कुणी केली असेल……?

Leave a Reply to writholicstudio Cancel reply